Rajan Salvi  Team Lokshahi
राजकारण

आमदार राजन साळवी यांची एसीबीकडून साडेचार तास चौकशी

एसीबीच्या अलिबाग कार्यालयात सकाळी ११ वाजता त्यांची चौकशी सुरु झाली. साडेचार वाजता चौकशी पूर्ण झाली.

Published by : Sagar Pradhan

निसार शेख। चिपळूण: एसीबीने राजन साळवी यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानुसार ते अलिबाग कार्यालयात बुधवारी चौकशीसाठी हजर झाले. त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा ताफा होता. मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे.माझ्यासोबत शिवसेना आहे. ही नोटीस जाणीवपूर्वक पाठवण्यात आली आहे. नोटीस अशीच येत नाही. यामागे शिंदे-फडणवीस सरकार आहे, असा आरोप साळवी यांनी केली. त्यानंतर ते चौकशीसाठी कार्यालयात गेले.

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) साडेचार तास चौकशी केली. एसीबीच्या अलिबाग कार्यालयात सकाळी ११ वाजता त्यांची चौकशी सुरु झाली. साडेचार वाजता चौकशी पूर्ण झाली. यावेळी एसीबी कार्यालयाबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

एसीबीने राजन साळवी यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानुसार ते अलिबाग कार्यालयात बुधवारी चौकशीसाठी हजर झाले. त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा ताफा होता. मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे.माझ्यासोबत शिवसेना आहे. ही नोटीस जाणीवपूर्वक पाठवण्यात आली आहे. नोटीस अशीच येत नाही. यामागे शिंदे-फडणवीस सरकार आहे, असा आरोप साळवी यांनी केला.

त्यानंतर ते चौकशीसाठी कार्यालयात गेले.तब्बल चार तासांनी साळवी यांची चौकशी पूर्ण झाली. ते कार्यालयाबाहेर आले. कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यानी एकच जल्लाेष केला. माझ्यासाठी रत्नागिरीतून कार्यकर्ते आले. रायगड जिल्ह्यातूनही कार्यकर्ते आले, याचे मला समाधान व आनंद आहे. या सर्व कार्यकर्त्याचे मी आभार मानतो, अशी प्रतिक्रिया साळवी यांनी दिली.

पुढे ते म्हणाले, एसीबीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी दिली आहेत. नगरसेवकापासून आमदार होईपर्यंतची सर्व माहिती एसीबीने विचारली. माझी व कुटुंबियांची माहितीही विचारण्यात आली. एसीबीने अजून काही प्रश्नांचा संच दिला आहे. त्याचा तपशील २० जानेवारीपर्यंत द्यायचा आहे. तो मी देणार आहे मात्र तक्रारदाराचे नाव एसीबीने सांगितले नाही. सनी नलवडे यांनी ही तक्रार केली असून त्याचा समाचार आपल्या पद्धतीने घेऊ, असेही साळवी यांनी स्पष्ट केले.

राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे राजन साळवी हे आमदार आहेत. ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत. एसीबीची नोटीस आल्यानंतर ते म्हणाले, मी मातोश्रीसोबत एकनिष्ठ असल्यानेच मला नोटीस बजावण्यात आली. मला नोटीस बजावण्यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असून हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा, असे आव्हानही साळवी यांनी दिले होते. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर ठाकरे गटाच्या आमदारांच्या मागे चौकशीचा सासेमीरा लागला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ind vs Eng 3rd Test Match : इंग्लंडनं 22 धावांनी सामना जिंकला; जडेजा-सिराजची झुंज अपयशी, इंग्लंड संघ 2-1 नं आघाडीवर

Latest Marathi News Update live : भारत विरूद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना भारताने गमावला; इंग्लंड 22 धावांनी जिंकली

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या व्हिडिओ काढण्यासंबंधीत 'त्या' विधानामुळे वादंग; मिश्रा, शर्मा, राय या वकिलांची महासंचालकांकडे तक्रार

Jio New Plans : युजर्ससाठी Jio चा नवीन 84 दिवसांचा प्लॅन; जाणून घ्या फायदे