राजकारण

केंद्रीय कायदेमंत्र्यांचा अपघात; कारला ट्रकने मारली टक्कर

जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात शनिवारी ही घटना घडली.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्या कारला अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये किरेन रिजिजू यांच्या कारला ट्रकने धडक दिली आहे. या घटनेत सुदैवाने रिजिजू थोडक्यात बचावले आहेत. जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात शनिवारी ही घटना घडली. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

माहितीनुसार, जम्मू-काश्मीर महामार्गावरून किरेन रिजिजू यांची गाडी जात असताना एक ट्रक ड्रायव्हर ट्रक रिव्हर्स घेत होता. यावेळी हा अपघात घडल्याची माहिती आहे. ट्रक मागे येत असतानाच किरेन रिजिजू यांची गाडी ट्रकच्या मागच्या भागाला जाऊन धडकली. या अपघातात रिजिजू थोडक्यात बचावले आहेत.

या अपघातात रिजिजू यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. त्याच्यासोबत त्या गाडीतील इतर लोकही सुरक्षित आहेत. सध्या स्थानिक पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?