राजकारण

गद्दारांची पॉलिटिकल सर्कस सुरू; आदित्य यांची ठाकरी टीका

Aditya Thackeray यांनी बंडखोर आमदारांवर डागले टीकास्त्र

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांनी शिवसेनेची (Shivsena) राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करून नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. यावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बंडखोर आमदारांवर ठाकरी शैलीत टीकास्त्र डागलं. गद्दारांची पॉलिटिकल सर्कस सुरू असल्याची टीका त्यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी आज वरळी मतदारसंघात विविध विकास कामांच्या शुभारंभाचा धडाका लावला. यावेळी ते बोलत होते. ज्यांना जायचं आहे त्यांनी जावं, पण त्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं जावं, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिलं. शिवसेना एकच आणि निष्ठावंत शिवसैनिक उद्धवसाहेबांसोबत आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून गंभीर प्रश्न उपस्थित केले. मंत्रिमंडळ नाही आहे. आज पूर परिस्थिती असताना, शेतकरी हवालदिल असताना मंत्रिमंडळ नाही हे खूप गंभीर आहे. तसंच आताचं जे आहे ते देखील मंत्रिमंडळ घटनेवर आधारित नाही, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. तर शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तर, दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्षप्रमुखपदाला मात्र हात लावलेला नाही. एकनाथ शिंदे गटाने घेतलेला हा निर्णय म्हणजे मूळ शिवसेना आमचीच असल्याचा दावा मजबूत करण्यासाठी ही कार्यकारणी घोषित करण्यात आली असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु, दीपक केसकरांनी हे वृत्त फेटाळले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?