राजकारण

सरकारकडे फॉरेन ट्रिप्सवर खर्च करण्यासाठी एवढा पैसा असेल तर...; आदित्य ठाकरेंचं आव्हान

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या ब्रिटन दौऱ्यावरुन आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या ब्रिटन दौऱ्यावरुन आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. उदय सामंत ब्रिटनमध्ये जाऊन नेमके करणार काय? कोणाला भेटणार आहेत? अशा प्रश्नांची सरबत्तीच आदित्य ठाकरेंनी केली आहे. गांधी जंयतींच्या निमित्ताने अतिशय नम्रतेने मी पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी हा दौरा रद्द करावा, असे आदित्य ठाकरेंनी म्हंटले आहे.

आपल्या राज्यातील खोके सरकारचे उद्योगमंत्री महोदय काय निर्णय घेणार? जनतेच्या पैश्यांवर रजा घेणार? की दौरा रद्द करणार? असे प्रश्न विचारत आदित्य ठाकरे म्हणाले की, आज गांधी जयंती निमित्ताने, अतिशय नम्रतेने मी पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी हा दौरा रद्द करावा. रजा घ्यायची असेल तर स्वखर्चाने अवश्य घ्यावी, पण जनतेचा पैसा उडवू नका, अशी विनंती त्यांनी केली आहे.

लंडन आणि म्युनिक मधील राऊंड टेबल कॉन्फरन्स ला कोण हजेरी लावणार आहे? लंडनमध्ये 'आर्टिफिशल इंटेलिजन्स'ची बैठक कोणी आयोजित केली आहे? दावोसला वर्ल्ड इकोनॉमिक फोरमचा कोणीही प्रतिनिधी आता नसताना आणि तिथे काहीच सुरु नसताना, नक्की कसली पहाणी करणार आहात? आपल्याला निवडून दिलेल्या जनतेची किती काळ थट्टा कराल? महाराष्ट्राच्या जनतेचं तुमच्या दौऱ्यावर लक्ष असेलच! आपल्या सरकारकडे फॉरेन ट्रिप्सवर खर्च करण्यासाठी एवढा पैसा असेल तर, चला चर्चा करूया आपण शेतकऱ्यांच्या मदतीची... आणि जून्या पेन्शन योजनेची, असे आव्हान देखील आदित्य ठाकरेंनी उदय सामंतांना दिले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

NEET-UG 2025 : निकालांविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Peanut Kadhi Recipe : आषाढीच्या उपवासाला तयार करा चविष्ट शेंगदाण्याची कढी

गरमागरम डाळ, भात अन् त्यावर तूप घालून खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या