राजकारण

बावनकुळेंच्या जागा वाटपावर शिवसेना नाराज; आदित्य ठाकरे म्हणाले, सर्कस सुरु

भाजपाच्या निवडणुकीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. भाजप 288 पैकी 240 जागा लढवणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : भाजपाच्या निवडणुकीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. भाजप 288 पैकी 240 जागा लढवणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. त्यामुळे शिंदे गटाला केवळ विधानसभेच्या केवळ 48 जागाच मिळणार असल्याचं दिसून येत आहे. यामुळे शिवसेनेत नाराजी दिसून येत आहे. यावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्व सर्कस सुरु असल्याची टीका त्यांनी दिली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, ही एक सर्कस आहे. सगळं हास्यास्पद सुरू आहे. गद्दारांना कुठेही सफलता मिळणार नाही. ३३ देशातील लोक त्यांच्यावर हसत होती, असे टीकास्त्र त्यांनी शिंदे गटावर सोडले आहे. सरकार प्रत्येक ठिकाणी कमी पडतंय. अवकाळीग्रस्त भागात कोणालाही मदत मिळाली नाही. राज्यात पूर्ण वेळ पर्यावरण मंत्री नाही आहे. केंद्रीय मंत्र्यांना वायू प्रदूषणावर पत्र लिहले आहे, असेही त्यांनी म्हंटले.

निवृत्त न्यायमूर्तींवर गंभीर आरोप विधिमंत्री किरेन रिजिजू यांनी केला होता. यावर आदित्य ठाकरे यांनी न्यायव्यवस्था स्वतःच्या हातात घ्यायचा प्रकार सुरु आहेत. जिथे सत्तेविरोधात बोलण्याऱ्यांविरुध्द अशा कारवाई केली जात आहे. देशात लोकशाही संपत चालली आहे की संपलेली आहे त्यावर चर्चा होऊ शकते. देशात लोकशाही नाही हे आता मानूनच चाललाय पहिजे. लोकशाही आणि संविधानांसाठी लढण्याची आता गरज आहे, असेही यांनी म्हंटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sushila Karki : सुशीला कार्की होणार नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान?

IND vs UAE Asia Cup 2025 : भारताचा युएईवर दणदणीत विजय

Sanjay Raut : राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांची भेट; संजय राऊत म्हणाले...

Latest Marathi News Update live : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मनसे नेत्यांची बैठक