Aditya Thackeray Team Lokshahi
राजकारण

तुम्ही खोके घेऊन तुम्ही एकदम ओके; आदित्य ठाकरेंनी शिंदेंना पुन्हा डिवचले

फक्त शिवसेनेच्या नाही, तर महाराष्ट्रातील तरुणांच्या पाठीत खंजीर खुपसला

Published by : Sagar Pradhan

शिवसेना नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आज पुण्यात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याप्रकरणी हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोर्च्यात बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच वेठीस धरलेलं पाहायला मिळालं. तुम्ही खोके घेऊन तुम्ही एकदम ओके झालात, पण आमच्या रोजगाराचं काय, असा प्रश्न तरुणांचा आहे. फक्त शिवसेनेच्या नाही, तर महाराष्ट्रातील तरुणांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असा आरोप करत त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आंदोलनात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आता कंपन्यांना सर्वात मोठा धोका चाळीस आमदार गद्दारांचा आहे. सगळीकडे दादा गिरी सुरु आहे. धमकवण्याची भाषा केली जात आहे. सर्वसामन्यांना पणं धमवकाल जात आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री पणं आहेत. काही ठराविक आहेत. भाई गिरीची भाषा आता जास्त वाढलेली आहे. अडीच वर्षात एवढी भाई गीरीची भाषा कधी वाढलेली नव्हती तेवढी आता वाढलेली आहे. असा आरोप त्यांनी शिंदे सरकारमधील मंत्र्यांवर टीका केली आहे.

पुढे आदित्य ठाकरे यांनी बोलताना मोठा खुलासा केला. ते म्हणाले की, वेदांता, बल्क ड्रग पार्कनंतर मेडिसिन डिव्हाईस पार्क प्रकल्प जो महाराष्ट्रात होणार होत. तो आता महाराष्ट्राबाहेर गेला आहे. खोके सरकारचं लक्ष त्यांच्या गटात कोण येतंय, याकडे आहे. पण राज्यात उद्योग कोणते येत आहेत, गुंतवणूक कोण घेऊन येतंय, याकडे कुणाचंच लक्ष नाही आहे, अशी जोरदार टीका त्यांनी खुलासा करताना सरकार केली.

महाविकास आघाडी सरकार असतं तर प्रकल्प गेलाच नसता

वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या मनात रोष आहे. जो प्रकल्प महाराष्ट्रात येणं गरजेचं होतं. जो येऊ शकत होता. तो प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला. महाराष्ट्रात येऊ शकणारा प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला. महाराष्ट्रातून एक-एक प्रकल्प बाहेर जात आहेत. शंभर टक्के तळेगावात येणारा प्रकल्प सरकार बदलल्यानंतर पळवलाच कसा? असा सवाल करत महाविकास आघाडी सरकार असतं तर प्रकल्प गेलाच नसता, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.आतापर्यंत महाराष्ट्रातून तीन प्रकल्प बाहेर गेले आहेत. त्यामुळे राज्यातील तरुणांच्या हातातील रोजगार देखील बाहेर गेले. हे सर्व होत असताना मुख्यमंत्री स्वतः साठी दिल्लीला गेले. परंतु, राज्यासाठी ते दिल्लीला एकदाही गेले नाहीत, अशी टीका करत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पुन्हा डिवचले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Water Supply : मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली, विंधन विहीर खोदकामाला परवानगी

OBC : ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात भरत कराड यांचा प्राणत्याग; कुटुंबाला आर्थिक मदतीची मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Weather News : गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका; राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Narendra Modi : नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधानांचे मोदींकडून अभिनंदन; भारत-नेपाळ मैत्रीचे अधोरेखन