CM VS AADITYA THACKERAY TEAM LOKSHAHI
राजकारण

राजीनामा द्या, वरळीतुन निवडणुक लढा...आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान; मुख्यमंत्र्यांचं खोचक प्रत्युत्तर

आदित्य ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंसह शिंदे गटाचे आमदार आणि खासदारांना राजीनामा द्या आणि निवडणूका लढा असं आव्हान सातत्याने देत असतात. आता आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना थेट वरळीतुन लढण्याचं आव्हान दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंच्या आव्हानाला खोचक प्रत्युत्तर दिलं.

Published by : Team Lokshahi

रोहित शिंदे | मुंबई: माजी पर्यटन मंत्री वरळीचे आमदार आदित्य ठाकरे. (MLA Aaditya Thackeray) शिवसेनेची शकलं झाली; आणि आदित्य ठाकरेंची आक्रमकता दिवसागणिक वाढत गेली. शिंदे गटाचे 40 आमदार आणि 13 खासदारांना आदित्य ठाकरे सातत्याने राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुका लढा असं आव्हान देत राहीले. इथपर्यंत हि बाब ठीक होती.

आता थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान: आता मात्र, आदित्य ठाकरेंनी कहरचं केला आहे. ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) आव्हान (Aditya Thackerays challenge to CM) दिलं आहे. शिंदेंनी राजीनामा द्यावा आणि वरळीतुन माझ्या विरूध्द निवडणुक लढावी असं आव्हान दिलं.

नरेश म्हस्केंचं प्रत्युत्तर: आता या ठाकरेंच्या आव्हानाला शिंदे गटाचे प्रवक्ते, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्केंनी (Naresh Mhaske) जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरेंनी माझ्याविरोधात ठाण्यातुन नगरसेवक पदाची निवडणुक लढावी....निवडुन यावं....आणि मग एकनाथ शिंदेंसोबत लढण्याची भाषा करावी, असं म्हस्के म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री शिंदेंचं खोचक प्रत्युत्तर: आता सुरूवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा विषयांवर भाष्य करतील असं वाटत नव्हतं. मात्र, आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिंदे-फडणवीसांनी सत्कार सोहळ्याचं (Shinde Fadnavis felicitation ceremony in Worli) निमित्त साधत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं, आणि याचं कार्यक्रमात शिंदेंनी आदित्य ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. मी अशी छोटी आव्हाने स्विकारत नाही....असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आता हे प्रकरण पुढे काय वळण घेतं ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा