मुंबई : शिवसेना ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची गळती थांबण्याचे नाव घेत नाही. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे राहुल कनल शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
शिवसेनेत दोन गट पडल्यापासून अनेक आमदार खासदार आणि नेत्यांसोबतच शिवसैनिकांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे सोबत जाणे पसंत केले आहे. अशातच आता आदित्य ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे राहुल कनल हे येत्या एक जुलै रोजी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी युवा सेनेच्या कोअर कमिटीच्या व्हॉट्सअप ग्रुप मधून देखील एक्झिट झाले होते. तेव्हापासूनच ते ठाकरेंची साथ सोडून इतर कोणत्यातरी पक्षात जाणार अशी चर्चा होती. आता त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असून येत्या 1 जुलै रोजी ते आपल्या समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी राहुल कनल यांच्या घरावर सीबीआयचा छापा पडल्यापासून राहुल कनाल हे शिवसेनेत फारसे सक्रियही नव्हते. मागील एक वर्षाच्या काळात ते शिवसेना भवन किंवा मातोश्रीवर देखील फिरकले नाहीत.