थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Advay Hiray) निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. अनेक पक्षप्रवेश देखील होताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडली असून आज ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबई येथील भाजपच्या कार्यालयात अद्वय हिरे यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. अद्वय हिरे यांच्या प्रवेशाने आता नाशिक जिल्ह्यात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
Summery
शिवसेना ठाकरे गटात मोठा भूकंप
ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांनी सोडली ठाकरेंच्या शिवसेनेची साथ
भाजपात करणार प्रवेश