नेहमी चर्चेत राहणाऱ्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे बंधु यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ठाकरे-पवार ब्रँड महाराष्ट्रातून संपणार नाही! राज ठाकरे यांची सडेतोड भूमिका मांडली होती. यावरुन आता गुणरत्न सदावर्ते यांनी भाष्य केले आहे.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, "ठाकरे ब्रॅंड असायला ते दुकान आहे का? आडणावाचा ब्रॅंड कधी नसतो", असं म्हणत त्यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला आहे. त्यामुळे आता सदावर्ते यांच्या वक्तव्यामुळे राजकीय पटलावर कोणते पडसाद उमटणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.