थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai BJP) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. बिहारनंतर आता मुंबई जिंकण्यासाठी भाजप सज्ज झाल्याचे पाहायला मिळत असून बिहारमध्ये युवा व महिलांची मते निर्णायक ठरलीत.
याच पार्श्वभूमीवर आता मुंबईत देखील महिला व युवा मतांसाठी विशेष रणनिती आखली जाणार आहे. भाजप युवा मोर्चा व महिला मोर्चावर विशेष जबाबदारी सोपवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डमध्ये विविध कार्यक्रम घेतले जाणार असून महिला आणि युवकांचे प्रश्न भाजपकडून प्राधान्याने सोडवले जाणार तसेच महिला व तरुण मतदारांचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
बिहारनंतर आता मुंबई जिंकण्यासाठी भाजप सज्ज
बिहारमध्ये युवा व महिलांची मते ठरली निर्णायक
मुंबईत महिला व युवा मतांसाठी विशेष रणनिती आखली जाणार