Gajanan Kirtikar Team Lokshahi
राजकारण

शिंदे गट प्रवेशावर किर्तीकर म्हणाले, मी जाण्याचे कारण राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर राजकीय प्रवास...

अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकार होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. आम्हाला दुय्यम स्थान मिळत होतं.

Published by : Sagar Pradhan

राज्यात राजकीय घडामोडी घडत असताना अशातच काही दिवसांपूर्वी खासदार गजानन कीर्तीकर शिंदे गटात प्रवेश केला. मात्र, या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसला. या प्रवेशावर ठाकरे गटाकडून अनेक मंडळींची प्रतिक्रिया आली. त्यावरच आता खासदार गजानन किर्तीकर यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली सविस्तर भूमिका मांडली.

काय म्हणाले किर्तीकर

पुण्यात माध्यमांशी बोलताना किर्तीकर म्हणाले की, मी 11 नोव्हेंबरला शिंदे गटात सामील झालो. मी शिंदे गटात जाण्याचं कारण म्हणजे ठाकरे गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर राजकीय प्रवास सुरू आहे तो घातक ठरणार आहे. त्यामुळेच शिंदे गटाने उठाव केला. बाळासाहेब ठाकरे गटात जे खासदार गेले त्याचंही तेच कारण आहे आणि मी सुद्धा शिंदे गटात गेलो त्याचंही तेच कारण आहे, असे कीर्तिकर यावेळी म्हणाले.

पूढे बोलताना ते म्हणाले की, अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकार होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. आम्हाला दुय्यम स्थान मिळत होतं. अधिकारी जुमानत नव्हते. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं मोठं प्रस्थ सुरू होतं. पडलेल्या पदाधिकाऱ्यांना निधी मिळत होता. हा सगळा प्रकार आम्ही उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवत होतो. त्यांना आवाज देत होतो. आम्ही एकमुखी मागणी केली की, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जो प्रवास सुरुय तो थांबवा”, असं गजानन कीर्तीकरांनी सांगितले.

उद्धव ठाकरे माझं तिकीट कापण्याचं काम करत होते

मी 2004 साली जेव्हा निवडणूक लढत होतो तेव्हा उद्धव ठाकरे माझं तिकीट कापण्याचं काम करत होते. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले की तिकीट दिलं पाहिजे. मी नोकरी सोडून पक्षाचं काम करत होतो. त्यांनी मला 2004 ला तिकीट दिलं. पण उद्धव ठाकरे विरोध करत होते. अखेर 2009 ला माझं तिकीट कापलं. माझ्या पीएला बोलावून तिकीट कापल्याचं सांगितलं, असं कीर्तीकर म्हणाले.

‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत होतो’

“मला सांगण्यात आलं की तुम्हाला काय हवंय? उद्धवजींनी जी संघटना चालवली त्यामध्ये मी काम केलं. पण माझं पुण्यातील काम खंडीत केलं. आणि सिनेअभिनेत्याला आणलं. खासदार अमोल कोल्हेंना काम दिलं. पुणे जिल्ह्यात कार्यकर्ते आहेत. अमोल कोल्हे सिरीअलमुळे लोकप्रिय झाले. पण आढळराव हरले”, असं कीर्तीकर म्हणाले.

खैरेंच्या विरोधात रावसाहेब दानवेंचा जावई उभा राहिला

औरंगाबादमध्ये माजी खासदार चंद्रकांत खैरेंच्या विरोधात रावसाहेब दानवेंचा जावई उभा राहिला आणि पैशांचा वापर केल्यामुळे हरला. त्यांनी खैरेंना राज्यसभा द्यायला हवी होती. मात्र प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभा दिली. काँग्रेसचे नेते सांगतात की त्यांना साधी विधानपरिषदही दिली नसती. मी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत होतो”, असा दावा गजानन कीर्तीकरांनी केला.

एकनाथ शिंदे बाळासाहेबांची शिवसेना यांचे विचार पटले

अमोल कीर्तिकर माझा मुलगा युवा सेनेचा पदाधिकारी आहे, तो निष्ठावंत आहे,स्वार्थी विचार त्याच्या मनात नाही,माझी इच्छा एकनाथ शिंदे सोबत जाण्याची आहे. अस म्हटल्यावर तो म्हटला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे संकटात आहे. पण मी म्हटलं एकनाथ शिंदे बाळासाहेबांची शिवसेना यांचे विचार पटले म्हणून मी जातोय,बोलून आम्ही दोघे वेगळं झालो आहे, सगळं आम्ही एकत्रित करतो,त्यांनी अनुभव घेऊन त्यांनी ठरवू दे. असे बोलत त्यांनी मुलगा अमोल कीर्तिकर यांच्याबद्दल भाष्य केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या