(Chhagan Bhujbal) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात भुजबळ यांचा शपथविधीचा सोहळा पार पडला. गेल्या काही दिवसांपासून मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज पाहायला मिळालं होतं. यावेळी भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेटही घेतली होती.
यातच आता छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळातील एन्ट्रीनंतर वर्षावर देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि धनंजय मुंडेंमध्ये (Dhananjay Munde ) खलबतं झाल्याची माहिती मिळत आहे. मंत्रिपदावर छगन भुजबळांची वर्णी लागली. त्यानंतर धनंजय मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे वर्षावर गेल्याची माहिती मिळत आहे.