राजकारण

निवडणूक गुजरातला अन् सुट्टी महाराष्ट्रात पॅटर्नवर अजित पवार संतापले; म्हणाले...

शिंदे-फडणवीस सरकारने गुजरात निवडणुकीच्या मतदानासाठी चार जिल्ह्यांमधील मतदारांना पगारी सुट्टी जाहीर केली आहे. यावर अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : गुजरात निवडणुकीसाठी आता केवळ काहीच दिवस शिल्लक असून सर्वपक्षीयांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. शिंदे-फडणवीस सरकारने गुजरात निवडणुकीच्या मतदानासाठी चार जिल्ह्यांमधील मतदारांना पगारी सुट्टी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षनेते अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. अशाप्रकारचा नवीन पायंडा पाडणं चुकीचं आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

अजित पवार म्हणाले की, आम्हीही सत्तेत होतो. पण, अशा सुट्ट्या दिल्या नाहीत. अशा प्रकारचे आदेश पहिल्या वेळेस पाहायवायस मिळत आहे. अशाप्रकारचा नवीन पायंडा पाडणं चुकीचं आहे. ३६५ दिवसांपैकी सर्व प्रकारच्या सुट्ट्या पकडून जवळपास पावणे दोनशे सुट्ट्या दिल्या जातात. सरकारी सहा महिने पगारी सुट्ट्या घेऊन सहा महिने काम करणे. जनतेचे कामे देखील झाले पाहिजे, असे त्यांनी सुनावले आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुध्दांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. याचाही अजित पवारांनी निषेध केला आहे. यामुळे तेढ निर्माण केली जात आहे. वाचाळवीरांना आवरा, असे मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटून सांगितले होते. आता वरिष्ठ पदावर बसणाऱ्या व्यक्तींनाही बोलताना तारतम्य राहिले नाही. सर्वांनी बोलताना काळजी घेणे गरजेचे आहे, असा सल्ला त्यांनी सर्वपक्षीयांना दिला होता.

राज्यपाल त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. त्यांना सुबुद्धी देवो. आम्ही कायम राज्यपालांना भेटायला जायचो. त्यावेळी राज्यपाल म्हणायच मुझे जानेका का है, मग आता जाण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य करता आहेत का, अशी शंका निर्माण होते. छत्रपती महाराजांच्या संदर्भात वक्तव्य करणाऱ्या महाराष्ट्रद्रोही वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. महागाई आणि बेरोजगारी संदर्भात बोलले जात नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

तर, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, हे राज्याचे अपयश आहे. मी मुख्यमंत्र्यांना दोष देत नाही. आम्ही सर्वच दोषी आहे. मराठी शाळा बांधायला हव्या. मला बैठकीला जाता आले नाही. पण, बैठकीत फीवर चर्चा झाली. दोन मंत्री नियुक्त केले आहेत. कर्नाटक यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. सरकार काय भूमिका घेणार हे कळले पाहिजे, असेही आवाहनही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा