बारामती विधानसभा निवडणुकीसंदर्भात अजितदादांनी मोठं विधान केलं आहे. जय पवार यांना उमेदवारी देण्याच्या मागणीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले की, शेवटी काय लोकशाही आहे. मला फार काही त्याच्यामध्ये रस नाही आहे कारण मी साठ- आठ निवडणुका केलेल्या आहेत. त्याच्यासंदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरुर तो ही विचार केला जाईल.
यासोबतच ते म्हणाले की, पार्लमेंटरी बोर्ड आणि त्याभागातील कार्यकर्ते जी काही मागणी करतील ते करायला आम्ही तयार आहोत. असे अजित पवार म्हणाले.