राजकारण

बारामती विधानसभा निवडणुकीसाठी आज अजित पवार मोठी घोषणा करण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा सुरु आहे.

Published by : Siddhi Naringrekar

राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा सुरु आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा बारामती आणि फलटणमध्ये येणार आहे. या यात्रेला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, खासदार सुनेत्रा पवार , सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत .

याच पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा निवडणुकीसाठी आज अजित पवार मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी म्हटले होते की, त्यांना विधानसभा निवडणूक लढविण्यात रस नाही.

त्यामुळे आता अजित पवार बारामतीतून स्वतः लढणार की जय पवार यांना उमेदवारी घोषित करणार याकडे लक्ष लागले असून बारामतीच्या उमेदवारीबाबत अजित पवार काय घोषणा करतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत