सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं. कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं आहे.देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. एन. डी. स्टुडिओमध्ये आज नितीन देसाईंना देणार अखेरचा निरोप देण्यात येणार आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जे जे रुग्णालयामध्ये नितीन देशमुख यांचे अंतिम दर्शन घेतलं. यावेळी माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, नितीन देसाई मृत्यू प्रकरणाची कसून चौकशी होईल. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार. आपल्या सर्वांचे दुर्देव आहे की ते लवकर आपल्यातून गेले. नितिन देसाई यांना काम सांगितले की ते उत्तम काम करायचे. चित्ररथ असो की शासकीय कार्यक्रम त्यांना काम सांगितले की ते उत्तम करायचे. असे अजित पवार म्हणाले.