राजकारण

Ajit Pawar : ...तर राजकारणातून बाजूला होईल

आज मुंबईत मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा उपसमितीची सह्याद्री अतिथी गृहावर सुरु असलेली बैठक संपली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

आज मुंबईत मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा उपसमितीची सह्याद्री अतिथी गृहावर सुरु असलेली बैठक संपली आहे. या बैठकीनंतर जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर आता मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. पोलिसांना लाठीचार्जचा आदेश वरिष्ठांनी दिल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला.

याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हटले आहे की, दोन दिवस आजारी होतो. त्यामुळे बाहेर पडता आलं नाही. त्यावरून अनेक समज-गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला. मराठा आरक्षणाचा मुद्दा कोर्टात टीकला पाहिजे. अनेकांकडून गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न होत आहेत. लाठीचार्जचे आदेश वरिष्ठांनी दिलं हे सिद्ध करा ते सिद्ध झाले तर आम्ही म्हणेल ते ऐकू. सण, उत्सवाच्या काळात शांतात राखा.

काहीजण जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीजण खुशाल सांगतात की वरून आदेश आल्यानंतर हे घडलं. मी सांगतो, वरून आदेश आले असं सिद्ध करून दाखवलं तर आम्ही म्हणाल ते हरू. काहीजण जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीजण खुशाल सांगतात की वरून आदेश आल्यानंतर हे घडलं. मी सांगतो, आम्ही तिघांपैकी कुणी तसे आदेश दिले असतील तर राजकारणातून बाजूला होईन. पण तसं सिद्ध नाही झालं, तर त्यांनी राजकारणातून बाजूला व्हावं. आहे का हिंमत? मागच्या काळात मराठा समाजानं शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन केलं. पण आत्ता त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला. जालन्यात जी घटना घडली, जो लाठीचार्ज झाला त्याबद्दल सगळ्यांनी त्याबाबतचा विरोध दर्शवला. असं व्हायला नको होतं. आमची सगळ्यांची तशीच भूमिका आहे. असे अजित पवार म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात खूप प्रगती कराल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Nashik-Mumbai Highway Accident : नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात! बस चालकाचं नियंत्रण सुटलं अन्...15 ते 20 प्रवासी

Beed Rain : बीडमध्ये पावसाचा हाहाकार! सहा गावांमध्ये 44 जण अडकले, बचाव मोहिमेसाठी...