आज विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. 7 डिसेंबर आणि 8 डिसेंबर असे दोन दिवस सत्ताधारी आणि विरोधक आमदारांचा शपथविधी पार पडला. कालपर्यंत 280 आमदारांनी शपथ घेतली तर आज उर्वरित 8 आमदार शपथ घेणार आहेत. राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून याचपार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडून राहुल नार्वेकरांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
मविआ उद्या गपगुमानी शपथ घेतील, काळजी करू नका- अजित पवार
असं असताना अजित पवार विरोधकांवर बरसले आणि म्हणाले की, संविधान हातामध्ये घेतल की संविधानाबद्दल आदर वाटतो का? मला माध्यमांकडून असा प्रश्न विचारण्यात आला होता की विरोधीपक्षातून कोण शपथ घेत नाही आहेत. कोणते ही पद स्विकारायचे असेल तर त्याआधी शपथ घ्यावीच लागते आज जर का यांनी शपत घेतली नाही तर यांना सभागृहात बसता येणार नाही उद्या गपगुमानी शपथ घेतील'काळजी करू नका असं मी त्यांना म्हणालो.
लोकसभेला ईव्हीएम कसा चांगला वाटत होता- अजित पवार
उगीच काही तरी स्टंटबाजी करायच... मारकरवाडीकरता आम्हाला ही प्रेम आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे. पण कारण नसताना ही कासाबाहू करायचं.... तुम्ही आता लक्षात घ्या की, आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे. आपल्याला जनतेनं नाकारलेल आहे. आमची बाजू खरी आहे. त्याच्यामध्ये कुठे ही खोट नाही आहे. लोकसभेला पण आमच्या जागा 17 आल्या होत्या आणि यांच्या जागा 31 आल्या होत्या पण आम्ही रडत नाही बसलो, जनतेचा कौल समजला आम्ही तेव्हा ईव्हीएम कसा चांगला वाटत होता.