राजकारण

अजित पवार की शरद पवार? पुणे शहर राष्ट्रवादीने निर्णय घेतला

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

Published by : Siddhi Naringrekar

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यावरुन शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत कोणत्या गटाला साथ द्यायची या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माहिती दिली आहे की, पुणे येथील राष्ट्रवादीचे कार्यालयाचा करार माझ्या नावाने आहे, त्यामुळे कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रश्नच येत नाही. कार्यालयाचा ताबा कुणी घेणार नाही, घेतला तर मला पोलीस तक्रार देण्याचा अधिकार आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पक्षात फूट पाडणाऱ्या भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा निषेध करण्यात आला. तसेच या काळात शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा शहर कार्यकारीणीत ठराव करण्यात आला. आपण सगळे पवार साहेबांसोबत आहोत. असे सुद्धा प्रशांत जगताप म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा

Sanjay Raut : मुंबईत आज साजरा होणार ‘मराठी विजय दिन’; संजय राऊतांनी सांगितली कार्यक्रमाची रुपरेषा

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांचीही हजेरी

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला