राजकारण

ते काय नाही देणार, इंच न् इंच जागा आम्ही घेणारच; अजित पवार कर्नाटकवर संतापले

कर्नाटकात अधिवेशनात आज सीमाप्रश्न विरोधी ठराव संमत करण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नागपूर : कर्नाटकात अधिवेशनात आज सीमाप्रश्न विरोधी ठराव संमत करण्यात आला आहे. काहीही झालं तरी एक इंच ही जमीन देणार नाही, असा पुनर्च्चार कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला. आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते काय नाही देणार त्यांच्या हातात काय आहे? देवळातली घंटा आहे का वाजवायची, असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

अजित पवार म्हणाले की, मी अगोदरच सांगितलं आहे की जेवढी जागा मराठी माणूस म्हणतोय की आमच्याकडे आली पाहिजे, तो भाग महाराष्ट्रात आला पाहिजे ती इंच ना इंच जागा आम्ही घेणार, ते काय नाही देणार त्यांच्या हातात काय आहे? देवळातली घंटा आहे का वाजवायची, असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

हे आताच्या शिंदे-फडणवीस सरकारचं अपयश आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जशास तसे उत्तर कर्नाटकला उत्तर का देत नाही? कशामुळे सरकार घाबरत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही यामध्ये बोटचेपेपणाचं धोरण घेत आहेत. कर्नाटक सरकारने केलेल्या ठरावाचा तीव्र निषेध करतो, असे टीकास्त्र अजित पवारांनी शिंदे-फडणवीसांवर सोडले आहे.

दरम्यान, कर्नाटकात अधिवेशनात आज सीमाप्रश्न विरोधी ठराव संमत करण्यात आला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद संपुष्टात आला असून कर्नाटकातील सीमाभागात सर्व काही आलबेल आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री बोम्माई यांनी केली आहे. उलट महाराष्ट्राचे मंत्री, खासदार, आमदार हे बेळगावला येऊन कायदा सुव्यवस्था बिघडवतात, असा आरोपही बोम्मईंनी केला आहे. यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात