राजकारण

...तर सभागृहात बेशिस्त वाढेल; पहिल्याच दिवशी अजित पवारांनी फटकारले

पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नागपूर : हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाला आहे. कामकाजाच्या सुरुवातीलाच अजित पवारांनी अख्ख्या मंत्रिमंडळालाच झापले. तुम्ही मंत्री आहात. मंत्र्यांनी नवे पायंडे पाडू नका. नाही तर सभागृहात बेशिस्त वाढेल, असे अजित पवार म्हणाले आहेत.

हिवाळी अधिवेशनात काही मंत्री शर्टाच्या खिशाला पक्षाची चिन्हे लावून विधानसभेत आले होते. त्यामुळे अजित पवार चांगेलच संतापलेले पाहायला मिळाले. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात. मुख्यमंत्री हा राज्याचा असतो. मंत्रीही राज्याचे मंत्री असतात. ते एखाद्या पक्षाचे मंत्री नसतात. असे असताना आपण ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाचे चिन्हे लावून सभागृहात कोणी येत नाही. पंतप्रधान मोदीही भाषण करताना चिन्ह लावून येत नाहीत. त्यामुळे नवीन पायंडे पाडू नका. नाही तर सभागृहात बेशिस्त वाढेल, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुनही अजित पवार आक्रमक झाले होते. गृहमंत्री अमित शहा यांनी सीमाभागावर वादाबद्दल दिल्लीत बैठक बोलावली होती. मुळात सीमाभागाच्या मुद्यावर कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. 6 डिसेंबरला चंद्रकांत पाटील आणि शंभुराजे देसाई सीमाभागात जाणार होते. पण, महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे त्यांनी टाळले. त्यानंतर कर्नाटकमध्ये कुणाला अडवणार नाही, असे अमित शहांसमोर ठरले होते. मग, आज आमदारांना कर्नाटकने का रोखलं, हे अजिबात आपण खपवून घेऊ नये, असे त्यांनी म्हंटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Amol Mitkari : प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते...; अंजली दमानियांच्या पतीची सरकारी संस्थेवर नियुक्ती, अमोल मिटकरींचा दमानियांना टोला

Pandharpur Rain Update : पंढरपूरला पूरसदृश परिस्थिती; चंद्रभागा वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली

ITR Filing Extension : करदात्यांना दिलासा; आयटीआर फाइल करण्यासाठी मुदतवाढ

Beed Rain Update : बीडमध्ये पावसाचा कहर; आज शाळांना सुट्टी जाहीर