राजकारण

मी अजित अनंतराव पवार...; उपमुख्यमंत्री पदाची घेतली शपथ

अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी होताना पाहायला मिळत आहेत. अजित पवार शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी राजभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती होती.

राष्ट्रवादीच्या काही आमदार आणि नेत्यांची आज अजित पवार यांच्या घरी महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर अजित पवार राजभवनावर दाखल झाले. त्यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही मंत्र्यासह राजभवनात दाखल झाले. दरम्यान, अजित पवार सत्तेत सहभागी झाले असून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहेत. ही शपथ घेताच अजित पवार समर्थकांनी सभागृहात एकच जल्लोष केला. तसेच, दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणाबाजीही करण्यात आली.

अजित पवार उपमुख्यमंत्री यांच्यासह दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्माराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, भाईदास पाटील, अनिल पाटील हे मंत्रिपदाची शपथ घेतली आहेत. तर, अजित पवार यांना 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचे समोर येत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुखद ! काका-पुतण्याच्या गळाभेटीने महाराष्ट्र सुखावला, आता पुढे काय होणार ? याकडे सगळ्यांचेच लागले लक्ष

Sushil Kedia Apologizes : मराठीबद्दल वादग्रस्त विधानानंतर अखेर सुशील केडियाने मागितली माफी