राजकारण

अजित पवारांच्या 'आमचा विठुराया' बॅनरची सर्वत्र चर्चा

पुन्हा एकदा अजित पवारांच्या बॅनरची चर्चा रंगली आहे

Published by : Shweta Shigvan-Kavankar

विकास कोकरे | बारामती : विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकदा बॅनर लागले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा अजित पवारांच्या बॅनरची चर्चा रंगली आहे. बारामतीत अजित पवारांचा 'आमचा विठुराया' या आशयाचा बॅनर झळकला आहे. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले असून हा पालखी सोहळा बारामती तालुक्यात येणार आहे. हा सोहळा बारामतीतील शारदा प्रांगण या ठिकाणी येणार असून येण्याअगोदरच बारामती शहरांमध्ये अजित पवार यांचे आमचा विठुराया अशा आशयाचे बॅनर चौकात लागलेले दिसून येत आहे. अजित पवार हे आमच्यासाठी तुमचा विठ्ठलच आहेत बारामतीकरांसाठी व राज्याच्या हितासाठी ते रात्रंदिवस झटत असून येणाऱ्या कालावधीमध्ये ते मुख्यमंत्री व्हावेत हेच आमची इच्छा आहे, अशी भावना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विशाल जाधव यांनी व्यक्त केली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिनी शरद पवार यांनी पक्षाच्या नव्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर सोपवली आहे. परंतु, या निर्णयानंतर अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा