राजकारण

अखिलेश यादव आणि प्रियांका गांधीं विमानात आमने सामने; युतीच्या चर्चांना उधाण

Published by : Lokshahi News

दिल्ली ते लखनऊ या विमानात अखिलेश यादव आणि प्रियांका गांधीं हे दोघे समोरासमोर आल्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक पक्षांच्या एकमेकांशी युती करण्याच्या चर्चाही सुरू आहेत. दरम्यान या भेटीत अखिलेश आणि प्रियांकाने एकमेकांना शुभेच्छा दिल्या असून. दोघांमध्ये काही वेळ चर्चा सुरुच होती. दोघांनी एकमेकांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर फोटोमुळे अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होत आहे. तो म्हणजे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित व्हायला अजून वेळ असला तरी हे दोन्ही पक्ष युती करणार का? अशी चर्चाही सुरू आहे.

अखिलेश यादव शुक्रवारी दिल्लीला पोहोचले होते. त्यांनी मुलायमसिंह यादव यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर अखिलेश लखनऊला परतत होते. काँग्रेस सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश प्रभारी प्रियंका गांधी वड्रा ह्या लखनऊला येत होत्या. दोघांमध्ये "मैत्रीपूर्ण" संभाषण झाले अशी माहिती प्रियंका गांधींच्या एका सहाय्यकाने हिंदुस्तान टाइम्सला सांगितले. त्यांनी लवकरच भेटले पाहिजे असे देखील सांगितले. निवडणुकीला पाच महिन्यांपेक्षा कमी अवधी शिल्लक असताना दोन्ही पक्ष एकत्र येवून भाजपा सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान समाजवादी पक्षाचे नेते उदवीर सिंह यांनी सांगितले कि आमच्यात कोणतीही युती होणार नसल्याचे म्हटले आहे. "आम्ही कोणत्याही राष्ट्रीय पक्षाशी युती करणार नाही, आम्ही फक्त लहान पक्षांशीच युती करणार आहोत. जे भाजपा सरकारला धोरणात्मकपणे पाडण्यास मदत करू शकतात, असे उदवीर सिंह म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा