राजकारण

'दिल्लीकरांच्या नादाला लागून गद्दारी करणाऱ्यांनी शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये'

अंबादास दानवे यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सचिन बडे | मुंबई - दिल्लीकरांच्या नादाला लागून गद्दारी करणाऱ्यांनी शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये, अशी घणाघाती टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पैठण येथील सभेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले होते. याला आज अंबादास दानवेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

१९९३ साली दंगल झाली तेव्हा मुंबई शिवसेनेने वाचवली, बाबरी मशीद पडली त्याची जबाबदारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उचलली होती. त्यामुळे शिवसेनाप्रमुख यांच्या शिवसेनेविषयी बोलण्याचा ती फोडण्याच पाप ज्यांनी दिल्लीकरांच्या नादाला लागून केलं, त्या शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांनी शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये, असा हल्लाबोल अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर केला.

शिवसेनेच्या हिंदुत्वावर शिंतोडे उडवण्याच पाप तुम्ही करताय आणि आज जाहीर सभेत ते कबूल केलं. ज्या पद्धतीने दिल्लीकरांपुढे झुकून महाराष्ट्राच अपमान करत आहात. ज्या दिल्लीकरांनी शिवसेना तोडली ते जर तुमचे आदर्श होत असतील तर ते तुम्हाला लखखाट होवो, असा घणघणात दानवे यांनी मुख्यमंत्री शिंदेवर केला.

मराठवाड्यात येऊन मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास विसरले, विकासाबाबत एक शब्दही काढला नाही, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे मराठवाड्याच्या विकासाला छेद देण्याच काम करत असल्याचा आरोप दानवे यांनी केला.

सामनाने भल्याभल्यांची वाट लावली

सामना वर्तमानपत्रातील अग्रलेख व बातमी यांची देशपातळीवर दखल घेतली जाते. सामनामध्ये आलेल्या बातमीने भल्याभल्यांची वाट लावली. त्यामुळे सामना या शिवसेनेच्या मुखपत्रावर टीका करताना संभाळून बोलण्याचा इशारा दानवे यांनी दिला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा