थोडक्यात
'लालूंना त्यांच्या मुलाला CM बनवायचंय'
'सोनिया गांधींना त्यांच्या मुलाला पीएम बनवायचंय'
अमित शाह यांचा विरोधकांवर हल्लाबोल
(Amit Shah) बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका सभेत बोलताना लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव आणि सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अमित शाह म्हणाले की, लालूंना त्यांच्या मुलाला CM बनवायचंय, तर सोनिया गांधींना त्यांच्या मुलाला PM बनवायचंय”
"मात्र बिहारमध्ये सीएमचं पद खाली नाही आणि दिल्लीमध्ये पीएमचं पद खाली नाही आहे. असे म्हणत अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बिहारमध्ये नितीश कुमारजी सीएम बनून बसले आहेत तर दिल्लीमध्ये नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री बनून बसले आहेत." असे अमित शाह म्हणाले.