राजकारण

‘अमित शाह दागिने घालून निघण्याचा जुमला’, प्रियंका गांधींची यांचा अमित शाहांना टोला

Published by : Lokshahi News

२०२२ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका होणार आहे. या निवडणुकी करीत नेत्यांच्या उत्तर प्रदेशमधील भेटी वाढल्या आहेत, भाजपासह, काँग्रेस इतर पक्षाचे नेते एकमेकांवर टीका करताना दिसून येत आहे. दरम्यान काँग्रेसची सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर उत्तर प्रदेशातील कानपूरमधील काही गुन्ह्यांच्या घटनांवरून निशाणा साधला आहे. अमित शाह 'दागिने घालून निघण्याचा जुमला' देतात, पण हे फक्त राज्यातील महिलांनाच माहीत आहे की त्यांना दररोज कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर म्हटले की, "आज १६ वर्षांची मुलगी देखील रात्री १२ वाजता दागिने घेऊन यूपीच्या रस्त्यावरून फिरू शकते, एवढं हे राज्य सुरक्षित आहे". दरम्यान शाह यांच्या याच वक्तव्यावरून प्रियंका गांधी यांनी म्हटले. प्रियंका गांधी यांनी ट्विटर केले, "देशाचे गृहमंत्री दागिने घालून निघण्याचा जुमला देतात, परंतु रोज कोणत्या प्रकारच्या गोष्टींना सामोरे जावे लागते हे फक्त यूपीच्या महिलांनाच माहीत आहे. आणि 'मी एक मुलगी आहे, मी लढू शकते' हे या राज्यात आवश्यक आहे. जेणेकरून महिलांचा राजकारणात आणि सुरक्षेशी संबंधित धोरणे बनवण्यात सहभाग वाढेल." असा टोला प्रियंका गांधी यांनी लगावला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Shahapur : शहापूरमधील R.S दमानिया स्कूल प्रकरण; फरार आरोपींच्या शोधासाठी 4 पथके तैनात

Accident : नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Latest Marathi News Update live : बच्चू कडू यांच्या 'सात बारा कोरा' यात्रेचा आज पाचवा दिवस

Latest Marathi News Update live : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंदाश्रमात दाखल