राजकारण

अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे अशी भावना - अमोल मिटकरी

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

Published by : Siddhi Naringrekar

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमोल मिटकरींनी अजित पवारांची भेट घेतली आणि त्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना मिटकरी म्हणाले की, अजित दादांनी राज्याचं नेतृत्व करावं. ही माझी नाहीतर जनतेची इच्छा आहे. पवार साहेबांनी आम्हाला ओळख दिली आहे. अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे अशी भावना आहे. आमचा पक्ष फुटलेला नाही आहे.

तसेच शरद पवार आजही आमचे आदर्श आहेत. संपूर्ण पक्ष अजित दादांसोबत आहे. असे मिटकरी म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुंबईसह ठाण्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज…

Weather News : मुंबईत काळ्या ढगांची गर्दी; पुढील तासांत मुसळधार पावसाची शक्यता

Credit Score : क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा, नेमकी प्रक्रिया कशी जाणून घ्या...

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींंना खरेदी करण्याचा योग, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य