मुंबई: अमोल मिटकरींनी पृथ्वीराज चव्हाणांवर टीका केली आहे. शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीवर चव्हाणांनी दावा केला होता. यावर अमोल मिटकरी नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. मिटकरींनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमच्या पक्षात डोकावण्याची त्यांना जुनी खोड आहे, असे म्हणत अमोल मिटकरींनी पृथ्वीराज चव्हाणांवर टीका केली आहे.