Devendra Fadnavis | Amruta Fadnavis Team Lokshahi
राजकारण

अमृता फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांसाठी घेतला खास उखाणा; एकदा पाहाच

अमृता फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांसाठी घेतलेल्या उखाण्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

Published by : Sagar Pradhan

देशात सर्वत्र नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे. ठिकठिकाणी गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेय. नागरिकांचा देखील या कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. यासोबत राजकीय मंडळीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावत आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नागपुरातील एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांसाठी खास उखाणाही घेतला आहे. तो उखाणा सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

नेमका काय घेतला अमृता फडणवीसांनी उखाणा?

नागपूरमध्ये एका गरबा कार्यक्रमाला अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी त्याठिकाणी गरबा खेळण्याचा आनंद लुटला. तसेच महाराष्ट्रातील सर्वांना त्यांनी नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी खास उखाणाही घेतला आहे. “मी फिरते मळ्यात, नजर माझी तळ्यात… देवेंद्रजी सारखे रत्न पडले माझ्या गळ्यात…” असा उखाणा अमृता फडणवीसांनी घेतला आहे. त्यांच्या या उखाण्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा