राज्यात सध्या अभूतपूर्व गोंधळ सुरु आहे. अशातच राजकीय वर्तुळात दररोज नवनवीन विषयावरून जोरदार आरोप- प्रत्यारोप सुरु आहे. शिवसेनेचा नेस्को येथे झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीका केली होती. त्यावरच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.
काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात म्हटले होते की, ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेवटची निवडणूक असेल त्यावरती उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, काय ते रोजच कुरकुर टूर टूर करतात त्या बाबतीत मी बोलू शकत नाही. अश्या प्रकारे त्यांनी उत्तर देतांना उद्धव ठाकरे यांना टोमणा मारला आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल होत की, 2019 मध्ये सगळ्यांनी मला संपण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरती बोलताना अमृता फडणवीस यांनी उत्तर दिलं की, ते रोज पुन्हा येतात. त्यांना कोणी मागे ढकलल तरी ते रोज पुढे येतात. ते त्यांच्या व्यक्ती महत्त्वाची एक युएसपी आहे,आणि ते पुन्हा चांगल्यासाठी येतात. अशा शब्दात त्यांनी फडणावीस यांच्या विधानांवर प्रतिक्रिया दिली.