Anil Deshmukh  Team Lokshahi
राजकारण

तब्बल वर्षभरानंतर अनिल देशमुखांची कारागृहातून सुटका, कार्यकत्यांकडून जोरदार जल्लोष

माजी गृहमंत्री अनिल देशमुख तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी जेलमधून बाहेर.

Published by : Sagar Pradhan

100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आज तुरुंगातून बाहेर आले. राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते अनिल देशमुखांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला होता. त्यांच्या जामीनाच्या स्थगितीला मुदत वाढवून देण्याच्या सीबीआयची मागणी कोर्टानं फेटाळली होती. त्यानंतर देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी जेलमधून बाहेर आले आहेत.

अनिल देशमुख कारागृहातून बाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी कारागृहाबाहेर त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी हजारो कार्यकर्ते आधीपासून कारागृहाबाहेर देशमुख यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. अनिल देशमुख बाहेर येताच कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय