राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अजित पवार यांच्यासोबत मंत्री अनिल पाटील यांनीही शपथ घेतली.
अनिल पाटील हे आता अजित पवार गटाचे प्रतोद असणार आहेत. खुद्द अनिल पाटील यांनी याबाबतची माहिती एका माध्यमाला दिली आहे.