राजकारण

अनिल देशमुखांवर सीबीआयकडून आणखी एक गुन्हा दाखल; अनिल देशमुख ट्विटरवर दिली माहिती, म्हणाले...

अनिल देशमुखांवर सीबीआयकडून आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अनिल देशमुखांवर सीबीआयकडून आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची माहिती स्वत: अनिल देशमुखांनी ट्विटरवरुन दिली आहे. अनिल देशमुख ट्विट करत म्हणाले की, धन्यवाद... देवेंद्रजी फडणवीस माझ्यावर #CBI कडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे.

जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले आहे. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता - न डगमगता मी #BJP च्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात फडणवीसांकडून किती खालच्या पातळीचे आणि विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण सुरू आहे ते जनतेने बघावे. लोकसभा निवडणुकीत या कारस्थानी नेतृत्वाला जनतेने जागा दाखवून दिली आहे, आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे ! असे अनिल देशमुख म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

Ashadi Ekadashi 2025 : शेतकरी, कष्टकरी, सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य