राजकारण

बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून राजन साळवींच्या घराचे मूल्यांकन; भूमिका मांडताना अश्रू झाले अनावर

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या एसीबीकडून चौकशी सुरु आहे. त्यातच आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या घरी पोहोचले.

Published by : Sagar Pradhan

निसार शेख|रत्नागिरी: ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची सध्या एसीबी चौकशी सुरू आहे. त्यानुसार त्यांच्या रत्नागिरी शहरातील घराचं देखील आज मूल्यांकन करण्यात आलं. एसीबीने दिलेल्या नोटिसीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे मूल्यांकन केलं. यावेळी राजन साळवी यांना आपल्या भावना अनावर झाल्या. दरम्यान या साऱ्या गोष्टीबद्दल बोलत असताना त्यांना अश्रू देखील अनावर झाले.

“हे घर मोठ्या कष्टाने उभारले आहे. त्यामुळे अशा पद्धतीने केलं गेलेलं मोजमाप वेदनादायी होतं”, अशा भावना साळवी यांनी बोलून दाखवल्या. शिवाय दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे रडायचं नाही आता लढायचं, असा निर्धार देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवला. राजन साळवी यांच्या घरी अधिकारी मोजमाप करण्यासाठी आले त्यावेळी ते देवपूजेला बसलेले होते.

काय म्हणाले राजन साळवी?

माझ्यासमोर मी उभं केलेल्या माझ्या घराचं आज बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोजमाप केलं. मी त्यांना घरातील हॉल, किचनमध्ये, बेडरुममध्ये येऊन मोजमाप करताना पाहिलं. आम्ही ज्या गोष्टी उभ्या केल्या त्याचं मोजमाप घेताना पाहिलं. या गोष्टीचं खूप वाईट आणि दु:ख वाटलं. जसं चित्रपटात पाहतो की, एखादं घर लिलावत जाण्याआधी त्याची आधी जप्ती होते, त्याचं मोजमाप केलं जातं. त्याच पद्धतीने मोजमाप घडताना पाहिलं”, असं राजन साळवी म्हणाले.

माझ्या घरावर 25 लाखांचं कर्ज आहे. त्याचा मी हप्ता व्यवस्थित भरतोय. पण गलिच्छ राजकारणामध्ये माझ्या घराचं लिलावासारखं मोजमाप करण्यात आलं. या गोष्टीचं दु:ख मला होतंय. माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत. ज्या पद्धतीने मला मानसिक त्रास दिला जातोय त्यामुळे मी आणि माझे कुटुंबीय दु:खी आहेत”, अशा भावना राजन साळवी यांनी व्यक्त केल्या.

“माझा विश्वास आहे, आतापर्यंत जे मी कमवलं ते मी माझ्या व्यवसायातून उभं केलेलं आहे. मला न्यायदेवतेवर विश्वास आहे. माझ्या मागे लागलेला हा चौकशीचा ससेमिरा आगामी काळात दूर होईल, अशी आशा बाळगतो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Janasuraksha Bill : विरोधकांच्या सभात्यागानंतरही विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयक मंजूर

Indian Coast Guard : अंदमान समुद्रात भारतीय तटरक्षक दलाची धाडसी कारवाई; 'Sea Angel' नौकेचे यशस्वी बचाव अभियान

Chhatrapati Sambhajinagar : धनगर विद्यार्थ्यांच्या शिक्षण योजनेत भ्रष्टाचार; दोन शाळांची मान्यता रद्द, अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

Latest Marathi News Update live : जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेतही मंजूर