राजकारण

संजय राऊतांच्या अटकेनंतरही सामनाची भाषा आक्रमकच; केंद्रावर टीकेची तोफ

Sanjay Raut यांना अटक, सामनातून राज्यपालांवर निशाणा

Published by : Team Lokshahi

मुंबई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने अटक केली आहे. यानंतर आज त्यांना पीएमएलए न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. अशातही सामनाचा अग्रलेख (Saamana Editorial) कोणत्या मुद्द्यावर भाष्य करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष होतं. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. कोश्यारी भाजपसाठी मतपेढी तयार करताहेत, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

दोन दिवसांपूर्वी त्यांनी गुजराती आणि राजस्थानी लोकांना मुंबई, ठाण्यातून बाहेर काढल्यास देशाची राजधानी ही ओळख राहणार नसल्याचं म्हटलं होतं. त्याचाच धागा धरत सामनातून राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. घटनात्मक पदावर बसून मुंबई-महाराष्ट्राच्या नागरिकांत जात-प्रांताची भेदाभेदी करणारी विधाने राज्यपाल कोश्यारी करीत आहेत. मुंबई-ठाणे काय किंवा महाराष्ट्र काय, मराठी माणसांबरोबर इतर भाषिक व प्रांतिक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. कोठेही मिठाचा खडा पडलेला नाही.

कोविड काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री या नात्याने सगळय़ांचाच सांभाळ केला. राज्यपाल मात्र जात-प्रांतात भेदाभेदी करून महाराष्ट्रात व हिंदुत्वात फूट पाडत आहेत. त्यामुळे कोश्यारी यांना राज्यपाल म्हणायचे की आणखी काही, असा प्रश्न मराठी माणसाला पडला असेल तर तो चुकीचा कसा म्हणता येईल! गुजराती, राजस्थानी, हिंदी भाषिक लोक यांना वेगळे पाडून भाजपसाठी वेगळी ‘मतपेढी’ करण्याचे काम घटनात्मक पदावरील व्यक्ती करत असेल तर राष्ट्रीय एकात्मतेची ऐशी की तैशी व्हायला वेळ लागणार नाही, असे टीकास्त्र सामानातून कोश्यारींवर सोडले आहे.

राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानावरून संतापाचा भडका उडाला. अशात संजय राऊत यांच्यावर ‘ईडी’ने रविवारी पहाटे धाडी टाकून राज्यपालांच्या भीषण वक्तव्यावरून लक्ष हटविण्याचा प्रयत्न केला. हे अपेक्षित होतेच. राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केल्याच्या वक्तव्यावर पाणी ओतण्यासाठी महाराष्ट्रात अशा कारवाया सुरू केल्या तरी विझणार नाही. संजय राऊत यांनी राज्यपालांच्या विधानाचा प्रखर शब्दांत शनिवारी समाचार घेतला व रविवारी सकाळी त्यांच्या घरी ‘ईडी’ची पथके पोहोचली. लोक काय ते समजून गेले. भाजप प्रत्येक गोष्ट पैसा, संपत्ती, व्यापारातच तोलतो. त्यामुळे त्यांना रक्त, घाम, अश्रूंचे मोल नाही, अशीही टीका सामनातून भाजपवर करण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी