राजकारण

Nitin Desai : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. एन. डी स्टुडिओमध्ये संपवल स्वत:चे जीवन. हिंदी, मराठी चित्रपटांसाठी दिग्दर्शन केलं. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे. नितिन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कला महाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले. १९८७ सालापासून त्यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली. २००५ मध्ये नितीन देसाईंनी मुंबईजवळील कर्जत येथे एनडी स्टुडिओ सुरु केला. 

कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं आहे.देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. जोधा अकबर', 'हम दिल दे चुके सनम', 'माचिस', 'देवदास', 'लगान' 'प्रेम रतन धन पायो' या सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कला दिग्दर्शन त्यांनी केलं. देसाई अनेक सरकारी कार्यक्रमाचं आयोजन देखील करायचे. अनेक शिवकालीन मालिकांचे कला दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. नितीन देसाई यांनी चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवला आहे, तर तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला आहे. देसाईंनी त्यांच्या शाळेत वामनराव मुरंजन हायस्कूल, मुलुंड येथे मराठी माध्यमात शिक्षण घेतले होते. चित्रपट क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी मुंबईतील जेजे स्कूल ऑफ आर्ट आणि एल. एस. राहेजा स्कूल ऑफ आर्ट्समध्ये फोटोग्राफीचे शिक्षण घेतले. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कला विद्यालयातून प्रकाश चित्रणाचे प्रशिक्षण घेतले होते. 1987 साली त्यांनी चित्रपट सृष्टीमधील कारकीर्द सुरूवात केली.

वीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्राथमिक माहितीनुसार, नितीन देसाई यांनी गळफास लावून आत्महत्या केली. एनडी स्टुडिओमधील काही कर्मचाऱ्यांना गळफास लावलेल्या अवस्थेत नितीन देसाई दिसून आले. कर्मचाऱ्यांनी लगेच पोलिसांना याबद्दल कळवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. स्टुडिओ सुरक्षा रक्षकाने पोलिसांनी माहिती दिली की, नितिन देसाई अनेकदा स्टुडिओत यायचे आणि रात्री उशीरा किंवा सकाळी जायचे ते आज बाहेर आले नाही म्हणुन सुरक्षा रक्षक पहायला गेला असता त्यांनी गळफास घेतल्याचे दिसले. सकाळी सुरक्षा रक्षकाने पोलिसांना फोन करुन माहिती दिली.

नितीन देसाई यांनी कला दिग्दर्शन केलेले चित्रपट

- परिंदा (1989)

- 1941- ओ लव्ह स्टोरी (1993)

- आ गले लग जा (1994)

- अकेले हम अकेले तुम (1995)

- खामोशीः द म्युझिकल (1996)

- दिलजले (1996)

- माचीस (1996)

- इश्क (1997)

- प्यार तो होना ही था (1998)

- हम दिल दे चुके सनम (1999)

- बादशहा (1999)

- जोश (2000)

- मिशन कश्मीर (2000)

- वन टू का फोर (2001)

- द लेजेन्ट ऑफ भगतसिंग (20002)

- मुन्नाभाई एम.बी.बी.एस. (2003)

- लगे रहो मुन्नाभाई (2006)

- धन धना धन गोल (2007)

- गॉड तुस्सी ग्रेट हो (2008)

- दोस्ताना (2008)

- वन्स अपॉन टाइम्स इन मुंबई (2009)

- बालगंधर्व (2011)

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद