कल्पना नसलकर | नागपूर : नव्या संसदेच्या उदघाटनावरुन राजकीय वातावरण सध्या तापलेलं आहे. संसदेचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याऐवजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. या वादात आता एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवेसी यांनीही उडी घेतली आहे. संसदेचे उदघाटन लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते केले तर पंतप्रधानांवर काही आभाळ फाटणार नसल्याची टीका ओवेसींनी केली आहे. दिल बडा करे प्रधानमंत्री, अशा शब्दात त्यांनी मोदींना सुनावले आहे.
नव्या संसदेत जेव्हापासून फाउंडेशन स्टोनचे शिलान्यास पंतप्रधानांनी केलं होतं. त्यानंतर राष्ट्रीय चिन्हाचे उदघाटने पंतप्रधानांनी केले होते. आता ही तिसरी वेळ आहे की संसदेचा उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. आमचे सुरुवातीपासून म्हणणं आहे की लोकसभा अध्यक्ष हे लोकसभेचे पालक असतात आणि पंतप्रधान हे एक्झिक्यूटीव्हचे हिस्सा आहेत.
अध्यक्ष हे विधीमंडळाचे भाग आहेत आणि पंतप्रधान मध्ये हस्तक्षेप करत आहेत. नव्या संसदेचे उदघाटन लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते झआले पाहिजे, अशी मागणी असुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. पंतप्रधानांचं नाव फाउंडेशन स्टोनवर आलं ना मग ओम बिर्ला यांच्या हस्ते उदघाटन केले तर काही आभाळ पडणार नाही. दिल बडा करे प्रधानमंत्री, असा टोला त्यांनी लगावला आहे.
तर लव्ह जिहादबाबत बोलताना ओवेसी म्हणाले की, भारताच्या संविधानात 18 वर्ष आणि 21 वर्षाचे जे होतात त्यांना लग्न करण्याचा पूर्ण अधिकार आहे. जसे मियां बीबी राजी तो क्या करेगा काझी, असं म्हणतात. महाराष्ट्रात हे जे आंदोलन चाललं आहे ते भाजप आणि आरएसएस सपोर्ट होतं. या सभांमध्ये ज्या-ज्या नेत्यांनी हेट स्पीच दिलं त्यांच्यावर एफआयआर दाखल व्हायला पाहिजे. नोकरी, रोजगारॉ, शेतकऱ्यांच्या गोष्टीवर तुम्ही बोलत नाही. भाजप सपोर्टेड हा प्रोग्राम होता. सरकार आणि आरएसएस सपोर्टेड हा कार्यक्रम होता. त्यात मुस्लिम समाजाविरोधात द्वेष पसरवणे हाच एकमेव उद्देश होता, अशी जोरदार टीका त्यांनी भाजपवर केली आहे.