Ashish Shelar | Uddhav Thackeray  Team Lokshahi
राजकारण

तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला, आता “पेग्विन सेना” म्हणायचे का; शेलारांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

सामनातील टीकेनंतर शेलार यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

Published by : Sagar Pradhan

राज्यात अभूतपूर्व गोंधळ घडत असताना भाजप- शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा वाद सध्या वाढतच चालला आहे. नुकताच सामना मधून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यावरून आता भाजपचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहित प्रश्न विचारला आहे. “आमच्या कमळाला ‘बाई’ म्हणत हिणवता, आम्ही तुम्हाला पेंग्विन सेना म्हणायचं का?”, असा सवाल शेलार यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. त्यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. या पत्रामुळे शिवसेना आणि भाजपमधील राजकीय संघर्ष आता आणखीच वाढण्याची शक्यता आहे.

काय लिहले शेलार यांनी ठाकरेंना पत्र ?

आशिष शेलार यांनी ट्विटद्व्यारे उद्धव ठाकरे यांना सवाल केले आहेत.त्यात ते म्हणाले की, “कृपया,हे लक्षात असू द्या!”, “मा. श्री.उध्दवजी ठाकरे, महोदय आपण आमच्या कमळाला हिणवायला “बाई” म्हणताय ? हरकत नाही, बाईमध्ये आई, ताई आणि कडक लक्ष्मीपण आहे.त्यामुळे तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला, आम्ही आता “पेग्विन सेना ” म्हणायचे का?ता.क. असे कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडे पण आहेत!, अश्या शब्दात यात त्यांनी उद्धव ठाकरेंना टॅग करत सवाल केलेला आहे.

सामना मधून काय केली होती भाजपवर टीका ?

“झारखंड, दिल्लीमध्ये ऑपरेशन लोटसचा प्रयत्न फसल्यानंतर भाजप अर्थात कमळाबाईची वाईट नजर आता काँग्रेसवर पडली आहे. पक्षांतर्गत नाराजीचा फायदा घेत महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये फूट पाडण्याची हातघाई भाजपकडून सुरू आहे,” अशी टीका शिवसेनेने सामनातून भाजपावर केली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा