राजकारण

'तुमचे मराठी माणसाला गाडा अन् आपला मॉल चालवा हेच मिशन'

आशिष शेलार यांनी दिले शिवसेनेला प्रत्युत्तर

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज सामना संपादकीयमधून टीकास्त्र सोडले. फोडा-झोडा-मजा पाहा, हेच कमळाबाईचं मुंबई मिशन, अशी टीका शिवसेनेने केली होती. या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. वाम मार्गाने मिळवलेले मुख्यमंत्री पद गमवावे लागले. हे सगळे अनर्थ एका अहंकारामुळे घडले. तरी पेंग्विन सेनेचे अग्रलेखातून दुसऱ्यावर खापर फोडण्याचे मिशन सुरुच असल्याचे आशिष शेलार यांनी म्हंटले आहे.

आशिष शेलार म्हणाले की, फोडाझोडा काय सांगता. पालिकेच्या मराठी शाळा बंद कुणी केल्या? सचिन वाझेला वसूलीला कुणी बसवले? ख्यातकीर्त डॉ. अमरापूरकर यांचा बळी कुणी घेतला? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसावर गोळ्या झाडणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत कोण बसले, अशी प्रश्नांची सतबत्तीच त्यांनी केली आहे. फोडा झोडा सोडा, तुमचे तर मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल चालवा हेच मिशन सुरु आहे, त्याचे काय, असा निशाणाही शेलारांनी शिवसेनेवर साधला.

मराठी माणसात फूट, ही आरोळी 100% झुट! महापालिकेत अमराठी कंत्राटदार, बिल्डर यांनीच पोसले. तीन लाख कोटीचे कमिशन कोणी खाल्ले? गिरणी कामगारांना उध्वस्त कोणी केले? मराठी पोरांना फक्त वडापाव विकायला कोणी लावले? आणि हे वर्षानुवर्षे मराठीच्या नावाने गळे काढायला मोकळे. आता म्हणे, पुढे चला? कुठे वसई कि विरार? कि आणखी त्याच्यापण पुढे? हे मिशन नव्हे कमिशन, असा टोलाही आशिष शेलारांनी शिवसेनेला लगावला आहे.

कर्तबगार नेते पक्ष सोडून गेले. बंधू राजांनी वेगळी चूल मांडली. खासदार, आमदार, नगरसेवक कंटाळले. वाम मार्गाने मिळवलेले मुख्यमंत्री पद गमवावे लागले. हे सगळे अनर्थ एका अहंकारामुळे घडले. तरी पेंग्विन सेनेचे अग्रलेखातून दुसऱ्यावर खापर फोडण्याचे मिशन सुरुच. स्वतःचे अपयश झाकायला मराठी माणसाची शाल कशाला पांघरताय? आपले अपयश झाकण्यासाठी आता मराठी कविता का आळवताय? आपल्या स्वार्थासाठी भगव्याला का बदनाम करताय? नाचता येईना अंगण वाकडे! आपला स्वतःचे अपयश झाकायला आता पर्याय तोकडे, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा