राजकारण

'कोण होतास तू काय झालास तू...'; शेलारांचा उध्दव ठाकरेंवर घणाघात, मविआच्या अट्टल चोरांनी...

मुंबई भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाची कार्यकारिणी बैठक पार पडली. यावेळी आशिष शेलार बोलत होते.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : गेल्या २५ वर्षात मुंबईकरांनी उद्धवजींच्या नेतृत्वाला आणि त्यांच्या शिवसेनेला प्रत्येक निवडणुकीत नाकारले. कायम घरचा रस्ता दाखवला. आमच्या समर्थनामुळे तुमचे आकडे खाली जात असतानाही तुम्ही खुर्च्या उबवत होता कारण हिंदुत्वासाठी आम्ही तुम्हाला समर्थन देत होतो. आता परिस्थिती बदलली आहे. आज तुमच्यासमोर भाकीत करतो की, उद्धवजींची शिवसेना येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ५० चा आकडाही पार करू शकणार नाही, अशी घणाघाती टीका मुंबई भाजपा अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केली. मुंबई भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाची कार्यकारिणी बैठक रविवारी दादर वसंत स्मृती येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते.

उद्धवजींची शिवसेना मुंबई महापालिकेत निवडणुकीत पन्नास चा आकडाही पार करू शकणार नाही. मुंबईकरांनी यांना नाकारले; झिडकारले. मुंबईकरांनी कधीच त्यांना आपल म्हणणं देखील टाळले आहे. मुंबईकरांचा प्रामाणिकपणावर भरोसा आहे, उबाठा शिवसेनेचे पाकीट मारीत मोठे नावच आहे. पाकीट मारीचा धंदा करणारे महापालिकेतले आणि मविआचे अट्टल चोरांनी मुंबईला लुटले आहे. प्रामाणिक काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईकर उभे राहतील याबद्दल माझ्या मनात बिलकुल शंका नाही, असेही आशिष शेलार म्हणाले.

मविआची बैठकीत शरद पवार यांची खुर्ची होती. या खुर्चीच्या आजूबाजूला एकही खुर्ची नव्हती त्यानंतर सोफ्यांची रांग होती. या सोफ्यावर बसलेल्या उद्धवजींना पाहिलं आणि मला गाणं आठवलं 'कोण होतास तू काय झालास तू...' ज्यावेळी आमच्यासोबत होतात; त्यावेळी देशाचं नेतृत्व तुमच्याकडे येत होतं. आज आम्हाला सोडून गेलात तर केजरीवाल ते केसीआरपर्यंत सतत सगळीकडे जावं लागतय. आमच्याबरोबर होतात तेव्हा खुर्चीचा सन्मान होता. आता तुम्हाला सोफ्याच्या रांगेत बसावं लागतंय. आमच्याबरोबर होतात तेव्हा शिवतीर्थावर तुमच्या सभा व्हायच्या. बीकेसीची चार मैदाने भरायची. आम्हाला सोडून गेलात तर तीन पक्ष एक होऊनसुद्धा आम्ही जे मैदान पार्किंगसाठी वापरलं तिथे तुमची सभा होते, असा निशाणा त्यांनी साधला आहे.

पावसाआधी मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी नाल्यावर भारतीय जनता पार्टीची माणसं जातात. एसी घरात बसलेले आदित्य आणि उद्धव ठाकरे याचे उत्तर देतील का? तुम्ही का नाल्यावर आला नाहीत? मुंबई पालिकेच्या निवडणुकीच्या निकाला दिवशी १५१ चा आकडा भाजपा, शिवसेना, रिपाई आणि एनडीए भाजपा महापौराच्या नेतृत्वात दिसेल आणि उद्धवजी आणि त्यांचे सुपुत्र ईव्हीएममध्ये गडबड आहे का ? याचे क्लास करत बसतील हे चित्र मी आजच स्पष्ट करतो,अशीही टीका आशिष शेलार यांनी उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा