राहुल गांधींनी केलेल्या टीकेवर आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. लोकसभेत आज नेत्यांची चर्चा झाली या चर्चेत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी अनेक मुद्दे मांडले आहेत. लोकसभेत राहुल गांधींकडून मतदारांच्या आकडेवाडीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला, तसेच राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर लोकसभेत कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी उत्तर दिले. राहुल गांधींनी केलेल्या याच टीकेवर आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल गांधींनी केलेल्या टीकेवर आशिष शेलारांचे प्रत्युत्तर
कॉंग्रेसला मतदारांनी जोरदार फटका दिला आहे, मात्र दारुण पराभवानंतर विरोधी पक्ष बेशुद्ध अवस्थेत आहेत अशी टीका आशिष शेलार यांनी राहुल गांधींवर केली आहे. आत्मचिंतन करण्याऐवजी आत्मपराभवाच प्रदर्शन विरोधक करत आहेत, असा टोला देखील आशिष शेलारांनी लगावला आहे. मतदार वाढले तर त्यात चुक काय आहे असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे.
राहुल गांधींनी केलेली टीका
राहुल गांधी म्हणाले होते की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 70 लाख नवीन मतदार वाढले, त्याचसोबत शिर्डीतल्या 7 हजार मतदारांचे पत्ते एकाच इमारतीचे असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. पुढे लोकसभेतील अर्थसंकल्पावरील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, राष्ट्रपतींच्या अभिभाषणात नवीन काहीच नव्हत... मागच्या वेळीही आम्ही असेच भाषण ऐकले होते... हे आपल्याला मान्यच करावं लागेल की, राष्ट्रपतींनी लोकसभेत अर्थसंकल्प दरम्यान जे अभिभाषण केलं त्यात बेरोजागारी, बेकारी हे शब्द देखील नव्हते... आज देशात सर्वात मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे बेरोजगारीचा.... इंडिया आघाडीचं सरकार असत, तर राष्ट्रपतींचं भाषण असं नसत, असं राहुल गांधी म्हणाले..