राजकारण

कलंक तर ते असतात, जे नाल्यातील गाळ खातात, रस्त्यावरचे डांबर खातात - आशिष शेलार

ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्या होमपीचवर जाहीर सभा घेतली.

Published by : Siddhi Naringrekar

ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्या होमपीचवर जाहिर सभा घेतली. यावेळी उध्दव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची एक जुनी ऑडिओ क्लिप ऐकवली. त्यात फडणवीस हे एकवेळ भाजप सत्तेत राहणार नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणार नाही. असे म्हणत आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, “अरे काय तुमच्या नागपूरला कलंक आहे हा” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

याच पार्श्वभूमीवर आता आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आशिष शेलार म्हणाले की, उध्दवजी, जे दुसऱ्यांसाठी जगतात ते कलंक कसे ठरतील?

कलंक तर ते असतात

◆जे नाल्यातील गाळ खातात

◆कोविडमध्ये सुध्दा भ्रष्टाचार करतात

◆गरिबांच्या पोरांच्या दप्तर, पाटी पेन्सिल मध्ये पण कट कमिशन खातात

◆जे रस्त्यावरचे डांबर खातात

◆जे "मी आणि माझं कुटुंब" एवढंच जगतात

थोडक्यात काय तर..

◆जे मुंबईकरांना लुटतात तेच कलंक ठरतात!

असे म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा