राजकारण

Ashish Shelar : ही कसली मुलाखत, ही तर जळजळ, मळमळ, अपचनाचे करपट ढेकर- आशिष शेलार यांची टीका

ठाकरे गटाकडून "आवाज कुणाचा" पॉडकास्ट सुरू करण्यात आले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

Uddhav Thackeray : ठाकरे गटाकडून "आवाज कुणाचा" पॉडकास्ट सुरू करण्यात आले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून हा पॉडकास्ट शिवसेनेच्या युट्युब चॅनेलवर सुरू करण्यात आले आहे. या पॉडकास्टच्या माध्यमातून ठाकरे गट तळागाळातील कार्यकर्ता आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचवणार आहे. आवाज कुणाचा या पॉडकास्ट मालिकेत उद्धव ठाकरे यांची मुलाखत प्रसारित करण्यात आली.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या विषयांना घेऊन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यातच आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. महाराष्ट्राच्या जनमताशी ज्यांनी बेईमानी केली ते इमानदार कसे? कितीही मुलाखती दिल्या तरी बेईमानीचे पुसणार नाहीत आता ते ठसे! ही कसली मुलाखत... ही तर जळजळ, मळमळ आणि अपचनाचे करपट ढेकर. स्वतः चा पक्ष, सरकार न सांभाळ्याच्या "कलंका"तून बाहेर पडण्याची धडपड!! भरलेला डालड्याचा डबा उपयोगाला तरी येतो, रिकामा डबा टमरेल ठरतो! एक काळ मुलाखतीतून वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे डागायचे ते असायचे. काडतुस हल्ली सगळं फडतूस, फडतूस आणि फडतूस! असे म्हणत शेलार यांनी ट्विट केलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा