राजकारण

अशोक चव्हाण आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

Published by : Siddhi Naringrekar

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अशोक चव्हाण यांनी पत्र लिहिलं आहे. पत्राच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला.

याच पार्श्वभूमीवर आता अशोक चव्हाण आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपमध्ये अशोक चव्हाण यांनी प्रवेश केला असून आज ते प्रमुख नेत्यांच्या उपस्थिती उमेदवारी अर्ज भरतील. यावेळी भाजपचे काही प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. अद्याप भाजपकडून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. मात्र अशोक चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा