राजकारण

PM Modi Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान

यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला.

Published by : Siddhi Naringrekar

यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. पुण्यातील सप महाविद्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडला. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.पंतप्रधान मोदी यांना खास उपरणे, पुणेरी पगडी, सन्मान पत्र आणि एक ट्रॉफी प्रदान करण्यात आली. तसेच या पुरस्कार सोहळ्यासाठी लोकमान्य टिळक वापरायचे तसंच खास उपरणं मोदी यांना देण्यात आलं.

लोकमान्य टिळक पुरस्कारात एक लाख रूपयांची रक्कम दिली जाते. ही रक्कम पंतप्रधानांच्या सुचनेप्रमाणे नमामी गंगे प्रकल्पासाठी देण्यात आली आहे. यंदाचा पुरस्कार कुणाला देण्यात यावा, यावर चर्चा करण्यासाठी सर्व विश्वस्त चर्चा करण्यासाठी बसले. तेव्हा आमच्यासमोर केवळ एकच नाव आलं, ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, नवे तंत्रज्ञान, नवे शैक्षणिक धोरण या सारख्या कार्यात टिळकांचा विचार दिसतो. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांचा सन्मान करताना आनंद होत आहे. हा पुरस्कार दिल्याने महान व्यक्तीचा सन्मान होतो आणि तरूणांसमोर आदर्श उभा राहतो. असे टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या