Babajani Durrani  
राजकारण

Babajani Durrani : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का; बाबाजानी दुर्राणी आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला परभणीतून मोठा धक्का बसला आहे.

Published by : Team Lokshahi

(Babajani Durrani) शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला परभणीतून मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी आज सकाळी 11 वाजता मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या समवेत शेकडो कार्यकर्तेही काँग्रेसचा झेंडा हाती घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांत मोठी उलथापालथ होताना पाहायला मिळत आहे पक्षात प्रवेश केल्यानंतर बाबाजानी दुर्राणी यांना परभणीमध्ये काँग्रेसकडून मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाबाजानी दुर्राणी यांनी 2004 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले.

यानंतर 2012 व 2018 मध्ये विधान परिषदेवर त्यांनी शरद पवार गटाचे प्रतिनिधित्व केले. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर काही काळ ते अजित पवार गटात गेले होते, मात्र पुन्हा शरद पवार गटात परतले. आता त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : ओबीसी मंडल यात्रेसाठी शरद पवार नागपूर दौऱ्यावर…

Raksha Bandhan Trafic Jam : रक्षाबंधनाचा आनंद वाहतूक कोंडीत अडकला; लाडकी बहिण-भावाचा सण सिग्नलवर थांबला

Nashik : रक्षाबंधन ठरलं अखेरचं! बिबट्याने केली भावाबहीणीच्या नात्याची ताटातूट

Raksha Bandhan : वलसाडमधील अनोखं रक्षाबंधन; बहीण सोडून गेली, पण तिच्या हाताने बांधली राखी