शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादीत कोणतीही फूट नाही आहे. अजित पवार आमचेच नेते आहेत. काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे पक्षात फूट होत नाही. फूट म्हणजे काय? पक्षात फूट कधी होते? जर पक्षातील एक गट वर्ग वेगळा झाला देश पातळीवर तर फूट पडली म्हणता येते. पण तशी स्थिती येथे नाही. पण कुणी पक्ष सोडला, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर तसा निर्णय घेण्याचा लोकशाहीत त्यांना अधिकार आहे. त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे फूट पडली असं म्हणता येत नाही. राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा मोठा गेम आहे. जास्त लक्ष दिलं तर डोकं फुटायची वेळ येईल. पवार साहेब जे बोलतात ते करत नाही. जे बोलत नाहीत ते करतात. शिवसेना फुटल्यानंतर जे घडलं तसं इथं दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन तीन रस्ते पाहून ठेवले असेल. सगळ्याचे संगम करून स्वतःचाच एक सागर निर्माण करत असतील. असे बच्चू कडू म्हणाले.