राजकारण

ठाकरे गट व वंचित भविष्यात वेगळे होतील; बच्चू कडूंचे भाकीत

शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात काही दिवसांपुर्वीच युती झाली

Published by : Shweta Shigvan-Kavankar

बालाजी सुर्वे | उस्मानाबाद : शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात काही दिवसांपुर्वीच युती झाली आहे. या युतीमुळे आता राज्यातील राजकीय समीकरण बदलतील असे संकेत वर्तवण्यात येत आहे. परंतु, ठाकरे गट व वंचित भविष्यात ते वेगळे होतील, असा दावा प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. बच्चू कडू हे आज उस्मानाबादला आले होते. यावेळी ते बोलत होते.

शिवसेना ठाकरे गट आणि वंचित हे एकत्र आले असले तरी उद्या ते वेगळे होतील. वंचित-शिवसेना यांचे कुठले मुद्दे ठरले आहेत का? भगवा हातात घ्यायचा की निळा की हिरवा कोणता रंग घ्यायचा ते काहीच ठरले नाही. त्यामुळे जेव्हा अंतर्मनातील रंग बाहेर येईल तेव्हा हे सगळे बेरंगवाले तुटून जाईल, असे बच्चू कडू यांनी म्हंटले आहे.

विद्यमान सरकारमध्ये आपण नाराज नसल्याचे आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे. मी शेतकऱ्यांबद्दल बोलत असतो, वस्तुस्थिती सांगतो. त्यामुळे नाराज आहे हे सांगणं चुकीचे असल्याचा निर्वाळा बच्चू कडू यांनी दिला. तसेच, केंद्राचा अर्थसंकल्प हिंदी भाषेत मांडला जावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मी केवळ नाममात्र, मराठा समाजाने यश मिळवलं… -जरांगे

Maharashtra Weather Update : मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाचा यलो अलर्ट

Pune Ganpati Visarjan News : पुण्यात गणपती विसर्जनाच्यावेळी दुर्दैवी घटना; एका युवकाचा मृत्यू

Chhagan Bhujbal On Manoj Jarange Maratha Protest : 'मराठा आणि कुणबी वेगळे, असं आरक्षण देताच येत नाही’; छगन भुजबळांची प्रतिक्रिया